Shiv Kumar Khurana Passes Away: आपल्या दिग्दर्शन कौशल्यानं चित्रपटाची खरी जादू पडद्यावर रंगवणारे अवलिया कलाकार शिव कुमार खुराना  (Shiv Kumar Khurana) यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मुंबईतल्या ब्रह्मकुमारी ग्लोबल रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1999 साली त्यांनी जालसाज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते जो त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यांच्या निधनानं बॉलिवूड कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी सत्तर ते नव्वद दशकातील मोठ्या सुपरस्टार कलाकारांना लॉन्च केले होते. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, विनोद खन्ना अशा कलाकारांना त्यांनी लॉन्च केले आहे. त्याचबरोबर गेली जवळपास 35 वर्षे ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. जरीना वहाब, कमाल सदना ते कादर खान, सदाशिव अमरापूरकर, रझा मुराद, रवींद्र महाजनी आणि अनुपम खेर अशा कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी कुस्तीपटू आणि अभिनेता दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह याला 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'करण' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. रवींद्र महाजनी यांच्यासोबतचा 'बे अब्रु' हा चित्रपट विशेष गाजला होता. 


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?



शिव कुमार खुराना  यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना नायकाची भूमिका दिली. ही विनोद खन्ना यांना मिळालेली पहिलीच संधी होती. सुनील दत्त यांच्या होम प्रोडक्शन निर्मित 'मन का मीत' (Man Ki Meet) या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ही भुमिका खलनायकाची होती.


त्यानंतरच विनोद खन्ना यांना खलनायिकाचा भुमिका ऑफर होऊ लागल्या. खलनायकासोबत शिव कुमार खुराना यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. शिव कुमार खुराना यांच्या 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'हम तुम और वो' (Hum Tum Aur Woh) या चित्रपटात विनोद खन्ना यांनी नायकाची भूमिका साकारली. 


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


शिव कुमार खुराना यांनी डेरिक्ट केलेले चित्रपट -  'मिट्टी और सोना', 'फर्स्ट लव लेटर', 'बदनाम', 'बदनसीब', 'बे आबरू', 'सोने की जंजीर' आणि 'इंतकाम की आग' अशा एकसोएक चित्रपटांचे दिग्दर्शन शिव कुमार खुराना यांनी केले आहे.  'हम तुम और वो', 'दगाबाज'  आणि 'अंग से अंग लगाले'  या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली.