मुंबई : प्रॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) मोठी अपडेट आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राने (Raj Kundra) न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपल्याला प्रॉर्नोग्राफी प्रकरणातून दोष मुक्त करण्यात यावं, यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला आहे. (pornography case actress shilpa shettys husband raj kundra application for acquittal in mumbai metropolitan magistrate court)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज कुंद्राने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्टात) अर्ज दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Criminal Investigation Department) राज याच्यासह त्याच्या कंपनीचा माहिती- तंत्रज्ञान प्रमुख रयान थोरपेला या प्रकरणी अटक केली होती. 


प्रॉर्नोग्राफी प्रकरण नक्की काय? (Raj Kundra Pornography Case)


राज आणि त्याच्या भावाने एकत्र येत 'केनरिन' कंपनी सुरु केली.  राजचा भाऊ हा ब्रिटनमध्ये असायचा. विशेष बाब म्हणजे आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी केनरिन या कंपनीची परदेशात नोंदणी केली होती.


या कंपनीचे काही  पेड App होते. या App द्वारे  पॉर्न फिल्म दाखवण्यात यायची. या ज्या पॉर्न फिल्म दाखवल्या जायच्या, त्याचं शूट मात्र भारतात केलं जायचं.


सिनेमातील कामाचं आमिष आणि...


या पॉर्न फिल्मसमध्ये काम करण्यासाठी मॉडेल्सना सिनेमात कामाची संधी देण्यात येईल, असं आमिष दिलं जायचं. त्यानंतर संपूर्ण शूट झाल्यावर ते परदेशात पाठवलं जायचं. मात्र अखेर राज कुंद्राचं बिंग फुटलं.