`या` मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केले बिकीनी फोटो
मराठी अभिनेत्री नेहा जोशीने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई : मराठी अभिनेत्री नेहा जोशीने नुकताच तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ब्लॅक बिकीनी घालून नेहाने शेअर केलेला हा फोटो पाहून उन्हाळ्याअगोदरच वातावरण गरम झाले आहे. नेहा नेहमीच तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते पण प्रथमच तिने बिकीनी घालून फोटो शेअर केला आहे. याअगोदर टॉपलेसही फोटो केला होता पोस्ट..
'झेंडा', 'पोश्टर बॉईज' यांसारख्या चित्रपटांत काम केलेल्या नेहाने याअगोदर एक टॉपलेस फोटो पोस्ट केला होता. तेजस नेरुरकरने काढलेल्या या फोटोमध्ये नेहाचा कलरफुल अंदाज दिसत होता. या फोटोला तिच्या फॅन्सनी चांगलेच पसंत केले. आता पुन्हा नेहाने तिच्या या फोटोने खळबळ उडविली आहे. नेहाने हा फोटो शेअर करत फोटोग्राफर तेजस नेरुरकरला इतक्या चांगल्या क्लिकबद्दल धन्यवादही दिले आहे.
पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज, जब लव्ह हुआ, सॅटर्डे सॅटर्डे बघतोस काय मुजरा कर या मराठी-हिंदी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय का रे दुरावा, ऊन पाऊस मालिकेतही नेहा जोशीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. नेहमीच नेहा जोशी तिचे हटेक आणि बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
मध्यंतरी तिने टॉपलेस फोटोही शेअर केला होता.विशेष म्हणजे इंटरनेटवर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात बघितलेही जात आहेत.त्यामुळे नेहा जोशीच्या या बिकनी अंदाजचीही फोटोशूटचीही जोरदार आणि तितकीच खुमासदार चर्चा सुरु आहे.