Abhishek Bachchan New Movie Poster Out: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा अनेक दिवसांपासून कोणताही चित्रपट आला नाही. पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अभिषेक बच्चनच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला आहे. अभिषेक बच्चनच्या नव्या चित्रपटाचे नाव 'बी हॅप्पी' आहे. जो तुम्हाला Amazon Prime व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच अभिषेक बच्चनच्या 'बी हॅप्पी' चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. यासोबतच चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना काही महत्त्वाची माहिती देखील देण्यात आली आहे. 


अभिषेक बच्चनचा नवीन चित्रपट 'बी हॅप्पी' 


Amazon Prime व्हिडीओच्या इन्स्टाग्रामवर  'बी हॅप्पी'  चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अभिषेक बच्चनलाही टॅग करण्यात आले आहे. यावेळी या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'All set to waltz right into your hearts!' 'बी हॅप्पी'  लवकरच Amazon Prime व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे..



या पोस्टरमध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत एक लहान मुलगी दिसत आहे. मात्र, अद्याप अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटात इलियाना डिसूजा, नोरा फतेही, इनायत वर्मा, जॉनी लिवर आणि हरलीन सेठी यांसारखे कलाकार असणार आहेत.  'बी हॅप्पी' हा चित्रपट रेमो डीसूजा दिग्दर्शित करत असून हा चित्रपट रेमो डीसूजाच्या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत बनवला जात आहे. 


अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट फ्लॉप ठरला


अभिषेक बच्चनचा 2023 साली प्रदर्शित झालेला 'घूमर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटात सैयामी खेर अभिषेकसोबत दिसली होती. या चित्रपटाचा विषय खूप चांगला होता. मात्र, तो प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. त्यानंतर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित करण्यात आला. आता अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट 'बी हॅप्पी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची पुष्टी झाली असून चाहत्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहावी लागणार आहे.