नवी दिल्ली : बाहुबली अभिनेता प्रभाससाठी चाहत्यांची 'दीवानगी' अनेकदा पाहण्यात आली आहे. आता तेलंगाणातील जंगममध्ये प्रभासच्या एका चाहत्याने असं काही केलं की, सर्वच जण हैराण झाले. प्रभासला भेटण्यासाठी हट्ट करणारा चाहता चक्क मोबाईल टॉवरवर चढला. प्रभास न भेटल्यास टॉवरवरुन उडी मारण्याची धमकीच चाहत्याने दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर प्रभासच्या चाहत्याचा टॉवरवर चढलेला फोटो समोर आलाय. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, चाहता मोबाईल टॉवरवर चढला आणि त्यांची प्रभाससोबत भेट करुन दिली नाही तर तेथून उडी मारण्याची धमकी देत होता. पोलिसांनी तसंच उपस्थितांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु चाहता खाली उतरण्यास तयार नव्हता.




दरम्यान, त्यानंतर हा प्रकार कशाप्रकारे हाताळला गेला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


याआधी 'साहो' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आंध्रप्रदेशमध्ये चित्रपटाचा बॅनर थिएटरवर लावताना एका चाहत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. 


३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही प्रभासच्या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाइड १० दिवसांत ४०० कोटींचा गल्ला जमवला.



'साहो'नंतर आता प्रभास आगामी चित्रपटात रोमॅन्टिक भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेसोबत प्रभासची केमेस्ट्री पाहायला मिळू शकते. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.