मुंबई : २०१७ मधील सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ला अजूनही अनेकजण विसरू शकलेले नाहीत. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स तोडत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सिनेमातील ड्रेसपासून ते शस्त्रांपर्यंत प्रेक्षकांना सर्वच पसंत पडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात प्रभासच्या तलवारीचाही समावेश आहे. प्रभासची ही तलवार मिळवणारा नक्कीच नशीबवान असेल. तो नशीबवान दुसरा तिसरा कुणी नसून विक्रम प्रभुचा मुलगा विराट आहे. 


अभिनेता प्रभास याने त्याची ती बाहुबलीमधील तलवार विराट याला गिफ्ट दिली आहे. प्रभासकडून मिळालेलं तलवारीचं गिफ्ट पाहून विराट चांगलाच आनंदी झाला आहे. त्याने या तलवारीचा फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. त्यावर त्याने प्रभासची तारीफही केली आहे. विराटने बाहुबलीचे आभारही मानले आहेत.



प्रभास हा सध्या त्याच्या ‘साहो’ सिनेमाचं शुटिंग करण्यात व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिकेत दिसेल. हा सिनेमा २०१८ मध्ये रिलीज होणार आहे.