मुंबई : 'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास सध्या लोकप्रियतेचा कळस अनुभवतोय... यातच प्रभासचा एक हॉट लूक इंटरनेटवर वायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो प्रभासनं ट्विटरवर अपलोड केला होता. हा केवळ फोटोशूट आहे की प्रभासच्या आगामी सिनेमाचा लूक? याबद्दल अनेकांना प्रश्न पडलाय. 


प्रभासच्या आगामी 'साहो' या चित्रपटात प्रभास या लूकमध्ये दिसू शकतो, असे कयासही बांधणं सुरू झालंय.  


प्रभासच्या बाहुबलीनं रेकॉर्डतोड कमाई केलीय... आणि त्याच्या आगामी प्रोजेक्टसकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्यात. प्रभास लवकरच हिंदी चित्रपटांतही दिसेल, अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.