GQ इंडिया मॅगझीनच्या कव्हर पेजवर नव्या अंदाजात दिसला प्रभास....
`बाहुबली` या सिनेमामुळे देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभाय.
मुंबई : 'बाहुबली' या सिनेमामुळे देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभाय.
आता एका नामांकित GQ या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकला आहे. या फोटोला शेअर करत त्यांनी आपल्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. GQ मॅगझीन इंडियाच्या 2018 या वर्षातील पहिल्या एडिशन कव्हर पेजवर प्रभास झळकला आहे. या कव्हर पेजवर प्रभास जास्त हँडसम दिसत आहे.
प्रभास द्वारे शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर भरपूर ट्रेंड झाला. या फोटोनंतर प्रभासच्या चाहत्यांना हा फोटो उचलून धरला. आपल्या आवडत्या हिरोचा हा फोटो नवीन वर्षानिमित्त गिफ्ट असल्याचं म्हणतं त्यांनी अधिक पसंती दिली.
प्रभासचा असा आहे नवा लूक
फोटोवरून प्रभास रॉयल ब्लू थ्री पीस सूटमध्ये दिसला. तसेच प्रभासने यासोबत ग्रेइश ब्लू शर्ट आणि रॉयल ब्लू टाय असा पेहराव केला होता. या फोटोत प्रभास अतिशय हँडसम दिसत आहे. प्रभास आता आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रभासचा "साहो" हा आगामी नवा सिनेमा आहे. या सिनेमांत प्रभाससोबत श्रद्धा कपूर लीड रत असल्याचं दिसतंय. श्रद्धा या सिनेमांत अॅक्शन शॉर्ट देताना दिसणार आहे.