मुंबई  : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानने यंदा बॉक्सऑफिसवर 'टायगर जिंदा है' या चित्रपटातून दमदार कामगिरी केली आहे. यानंतर सलमान खानचे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत ? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.  


दबंग 3 कडे लक्ष  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान आता 'रेस 3', 'दस का दम' हा रिएलिटी शोनंतर आता दबंग 3 या चित्रपटामध्येही झळकणार आहे. 'दबंग' या चित्रपटाचे पहिले दोन सिक्वेस बॉक्सऑफिसअवर सुपरहीट ठरले आहेत. त्यानंतर आता तिसर्‍या भागामध्ये काय होणार ? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहेत.  


प्रभूदेवा करणार दिग्दर्शन  


दिग्दर्शक प्रभूदेवा हा सलमान खानच्या 'दबंग 3' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शन अरबाज खान याने केले होते. मात्र आता प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 


सलमान - सोनाक्षी पुन्हा एकत्र   


सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी पुन्हा रूपेरी पडद्यावर येणार आहे. प्रभूदेवासोबत सोनाक्षी सिन्हाचा  हा पाचवा चित्रपट आहे.  या चित्रपटातून 'चूलबूल पांडे' ही सलामान खानची भूमिका खूपच लोकप्रिय झाली आहे.