फुगड्या खेळण्यापासून किर्तन ते स्वयंपाक करण्यापर्यंत प्राजक्ता गायकवाड वारी जगली; Video पाहिले का?
Prajakta Gaikwad in Wari : प्राजक्ता गायकवाड वारीत सहभागी झाली होती. वारीतील प्राजक्ताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहता अनेकांनी प्राजक्ताचे कौतुक केले आहे.
Prajakta Gaikwad in Wari : सध्या सगळ्यांना प्रतिक्षा आले आषाठी एकादशीची... त्यात वारीला जाणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी वाढ. वारीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असल्याचे आपण पाहतोय. काही दिवसांपूर्वीच वारकरी विठुरायाच्या नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. या वारीत फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी होतात. यंदा ही सेलिब्रिटी दुसरी कोणी नाही तर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आहे. प्राजक्तानं त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
प्राजक्ता गायकवाड ही झी टॉकीजच्या आषाढी एकादशी वारी स्पेशलसाठी पोहोचली होती. त्यावेळी प्राजक्ता शूटमधून वेळ मिळाल्यानंतर वारीत काय काय करत होती ते सांगत व्हिडीओ शेअर केला आहे. प्राजक्तानं हे व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. प्राजक्तानं सगळ्यात आधी स्वयंपाक करण्यात सगळ्यांना मदत केली हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की "आज आषाढी एकादशी निमित्त झी वारी स्पेशल शूट करत होते... शूटच्या मध्ये मध्ये या माऊलींसोबत स्वयंपाक करताना मन अगदी भरून आलं..." तर प्राजक्तानं दुसरा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता विठू माऊलीचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तर त्यानंतर प्राजक्ता भजन-कीर्तनात मग्न झाल्याचे देखील पाहायला मिळते. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्तानं कॅप्शन दिलं की "भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली ...जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली."
पुढे प्राजक्तानं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता फुगडी खेळताना दिसत आहे. फुगडी खेळतानाचा आनंद हा तिच्या आनंदात पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत "वारी म्हटलं की फुगडी ही आलीच..." असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या सगळ्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंवर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा : "सेक्स ड्युटी आणि मुलांना जन्म देणं...", लग्नाआधी मुलींना समजावतात 'या' गोष्टी; नीना गुप्ता यांचा खुलासा
प्राजक्ता ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये साकारलेल्या तिच्या महाराणी येसूबाई या भूमिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेतून प्राजक्तानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ताचे इन्स्टाग्रामवर 706K फॉलोवर्स आहेत.