Prajakta Mali Phullwanti Teaser : मागील काही महिन्यांपासून लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री 'फुलवंती' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या भव्य चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशात या चित्रपटाचा लक्षवेधी टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा भव्यतेने येणारा ‘फुलवंती’ हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची  दमदार कथा असलेली आणि देखण्या  कलाविष्काराने  सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरेल. समोर आलेल्या या टीझरमध्ये फुलवंतीची लोकप्रियता किती आहे. त्याचा एक अंदाज येतोय. कोणत्याही समारंभात तिचा एक नाच व्हावा यासाठी सगळेच कशी आशा करत असतात. तर दुसरीकडे व्यकंट शास्त्री  हे कशा प्रकारे फुलवंतीला भेटतात आणि त्यांच्यातील भेट या सगळ्याची एक झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. अविनाश- विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी,प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या  संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.


हेही वाचा : 'त्यांचा राग आणि...', पूर्वाश्रमीच्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मुलींसाठी स्वत: ला दोषी समजायचा फरहान अख्तर


चित्रपटात दिसणाऱ्या कलाकारांविषयी बोलायचे झाले तर प्राजक्ता माळी ही फुलवंतीच्या भूमिकेत दिसत आहे तर व्यकंट शास्त्री यांच्या भूमिकेत गश्मीर महाजनी दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात प्रसाद ओक, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितिज तिथि, ऋषिकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, दीप्ति लेले, वनिता खरात आणि चेतना भट्ट दिसत आहेत. तर स्नेहल तरडे ही दिग्दर्शनासोबतच या चित्रपटात अभिनय करताना दिसत आहे. दरम्यान, हा चित्रपट 11 ऑक्टोबरला येणार असून प्राजक्ताचे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत.