Made in Heaven 2 : अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच 'मेड इन हेवन' या वेब सीरिजचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या बौद्ध लग्नाची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा सुरु आहे. आता हा सीन काय असेल असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर या सीरिजमध्ये एक एपिसोड हा अभिनेत्री राधिका आपटेमुळे चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्यात आंतरजातीय विवाहसोहळा दाखवण्यात आला आहे. त्यात राधिकाचा होणारा पती हा उच्चभ्रू हिंदू जातीय असतो. तर त्यात राधिका ही तिच्या होणाऱ्या पतीला हिंदू विवाहपद्धतीसोबतच बौद्ध पद्धतीनं लग्न सोहळ्यास तयार करते. त्यामुळे हा सीन चर्चेत आला असून प्रेक्षक त्याचं तोंड भरून कौतुक करत आहेत. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी राधिका आपटेच्या या दलित लग्नाच्या एपिसोडचं सोशल मिडीयावर भरभरुन कौतुक केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या एपिसोडमधील दोन फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं होतं की 'मला दलित स्त्री पात्र पल्लवीची जिद्द, अवहेलना आणि प्रतिकार आवडला. तुम्ही सर्व वंचित आणि बहुजनांनी ही सिरीज जरुर पहावी. तरच तुम्ही स्वतःची ओळख सांगू शकाल आणि तुम्हाला राजकीय महत्त्व प्राप्त होईल.' 



हेही वाचा : राधिका आपटेचं बौद्ध पद्धतीचं लग्न चर्चेचा विषय; Video पाहून नेटकरी भारावले, कौतुकाचा वर्षाव


प्रकाश आंबेडकरांनी तोंड भरून कौतुक केल्यानंतर त्यावर दिग्दर्शक नीरज घायवान यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'बस्स! खूप धन्यवाद सर. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.' 




'मेड इन हेवन' या वेब सीरिजविषयी बोलायचे झाले तर त्याचा हा दुसरा सीझन आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनमधील अनेक गोष्टींवर सोशल मीडियावर चर्चा होत असून प्रेक्षक कौतुक देखील करत आहेत. सध्या चर्चा सुरु असलेल्या या लग्नाचा सीन हा पाचव्या एपिसोडमध्ये आहे. या एपिसोडचं नाव हार्ट स्किप्ड ए बीट असं आहे. राधिका आपटेनं या सीरिजमध्ये पल्लवी मांडके ही भूमिका साकारली आहे. खरंतर आंतरजातीय लग्नासाठी पल्लवी ज्या प्रकारे तिच्या होण्या पतीला तयार करते त्यामुळे हा सीन आणि खास करून हा एपिसोड चर्चेत आहे. अभिनेत्री राधिका आपटेचे सगळीकडे चांगलीच चर्चा सुरु आहे.