PRAKSH RAJ HEALTH UPDATE: जयकांत शिखरे परतला, सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण
प्रकाश राज यांनी सर्जरी आधी ट्विट करत `माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लवकर बरा होवो यासाठी प्रार्थना करा अशी विनंती चाहत्यांना केली होती.
मुंबई : सिंघम चित्रपटातील जयकांत शिखरे आता परतला आहे. आपल्या खलनायकी अंदाजात प्रेक्षकांमध्ये आपला दरारा निर्माण करणारा अभिनेता प्रकाशराज यांना काही दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना दुखापत झाल्याचं खुद्द राज यांनीच ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं., हल्लीच्याच दिवसांमध्ये आपल्याला दुखापत झाल्याचं त्यांनी या ट्विटमधून सांगितलं.
दुखापतीबाबत माहिती देत त्यांनी आपल्याला लहानसं फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. ज्यामुळं सर्जरीसाठी आपण हैदराबादला जाणार असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
'एक लहानशी दुखापत आहे. डॉक्टर गुरुवरेड्डी यांच्या सुरक्षित हाती मी सर्जरीसाठी स्वत:ला सोपवतोय. मी बरा होईन, काही चिंता करण्याचं कारण नाही.... मला तुमच्या विचारांत कायम ठेवा', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.
प्रकाश राज आता सुखरुप
आता त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रार्थनेनंतर राज यांची सर्जरी पुर्ण झाली आहे. आणि ते अगदी सुखरुप आहेत.नुकताच त्यांनी हॉस्पिटलमधील फोटो ट्विट केला आहे आणि डेविल इज बॅक असं कॅप्शन दिलं आहे.त्याची ही पोस्ट पाहताच चाहते देखील खूश झाले आहेत.
प्रकाश राज यांनी सर्जरी आधी ट्विट करत 'माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लवकर बरा होवो यासाठी प्रार्थना करा अशी विनंती चाहत्यांना केली होती. आता लवकरच ते घरी परतणार आहेत.
हिंदी चित्रपटांमध्येही प्रकाश राज यांच्या नावाला वजन आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट असणारा हा चेहरा हिंदी चित्रपटांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे.