मुंबई : चित्रपटात खलनायकाची भूमिकाही खूप महत्त्वाची असते.मनोरंजन क्षेत्रात अनेक खलनायक प्रसिद्ध आहेत. अमरीश पुरी, ओम पुरी यांसारख्या अभिनेत्यांनीही अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रकाश राज हा त्या खास खलनायकांपैकी एक. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यांनी दक्षिणेतील जवळपास सर्व भाषांमध्ये त्याने काम केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर प्रभुदेवा दिग्दर्शित 'वॉन्टेड' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. या चित्रपटात प्रकाश राज यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. त्याच्या पहिल्याच हिंदी चित्रपटातील त्याच्या खास अभिनयाने प्रेक्षकांवर जादू केली. त्याला आणखी चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा बॉलिवूड स्टार्सनी व्यक्त केली. आणि त्यानंतर सिंघम चित्रपटात जयकांत शिकरे यांची भूमिका त्यांनी साकारली.


या चित्रपटात त्यांच्या बोल्ड स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली. यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिकाही साकारली. प्रकाश राज यांचा जन्म कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला. गेली अनेक वर्षे प्रकाश राज दक्षिणेतील सिनेसृष्टीत आणि आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.


अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर प्रकाश राज यांनी 2010 मध्ये पोनी वर्मासोबत लग्न केलं. आता दोघांच्या लग्नाला 11 वर्षे झाली असून त्यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. विशेषतः त्याच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांचे लग्न बघायचं होतं. आणि म्हणून प्रकाश राज आणि पोनी वर्मा यांनी एक मोठा कार्यक्रम केला, त्यांनी पुन्हा लग्न केलं. लाडक्या मुलाच्या जिद्दीपुढे प्रसिद्ध खलनायकालाही नतमस्तक व्हावं  लागले. मुलाच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा लग्न केले. सध्या प्रकाश राज आणि पोनी वर्मा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. दोघांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्न केलं होतं. दोघांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर चाहत्यांना आधी धक्काच बसला. नंतर त्याचे कारण समोर आल्यावर चाहत्यांनीही त्याचं कौतुक केलं.


या फोटोंमध्ये प्रकाश राज आणि पोनी वर्मा एकमेकांना किस करत आहेत. पोनी वर्मा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. पोनी वर्माने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये कोरिओग्राफर म्हणूनही काम केलं आहे.