Prakash Raj Break Silence On Joining BJP : दाक्षिणात्य अभिनेते आणि सिंघम चित्रपटातील व्हिलनची भूमिका साकारलेले प्रकाश राज हे कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. प्रकाश राज यांनी अनेक नकारात्मक भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. प्रकाश राज हे त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठीही खूप प्रसिद्ध आहेत.  ते अनेकदा बेधडक वक्तव्य करताना दिसतात. आता प्रकाश राज यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते प्रकाश राज हे कायम भाजपविरोधी भूमिका घेताना दिसतात. तसेच ते कायमच भाजपवर टीका करताना दिसतात. ते अनेकदा भाजपच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर राग व्यक्त करत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून प्रकाश राज हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच आज एका ट्विटर अकाऊंटवरुन प्रकाश राज आज दुपारी 3 वाजता भाजपत प्रवेश करणार असल्याचे ट्वीट करण्यात आले होते. त्यावर आता प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


प्रकाश राज यांचे ट्वीट


प्रकाश राज यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी एका ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 'प्रकाश राज आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये प्रवेश करतील', असे लिहिण्यात आले आहे. त्यावर प्रकाश राज यांनी टोला लगावला आहे. "मला असं वाटतंय की त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या हे लक्षात आलं असावं की मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत...तुम्हाला काय वाटत मित्रांनो", असे प्रकाश राज यांनी ट्वीट करताना म्हटले आहे. 



प्रकाश राज यांच्या या ट्वीटवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यात एकाने "काय सांगता त्यांनी प्रयत्न केले होते", असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने "सर वेळेचे काहीही सांगता येत नाही. उद्या कदाचित तुम्हीही पक्षप्रवेश कराल", अशी कमेंट केली आहे. 


दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या धोरणांविरोधात जाणारे अनेक नेते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंद्र सिंगने काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.   2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्या प्रवेश करत दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर आता नुकताच प्राध्यापक गौरव वल्लभ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल शर्मा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.