Prasad Oak Viral Video : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक हा नेहमीच चर्चेत असतो. प्रसाद सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओक सगळ्यांच्या संपर्कात राहतो. सध्या प्रसाद त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला. त्यावेळी त्याला तिथल्या लोकांसोबत कसा अनुभव आला याविषयी सांगितले आहे. यावेळी त्यानं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया पण दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसादनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रसाद शूटिंगच्या स्थानी उभा असल्याचे दिसत आहे. प्रसादचे चाहते त्याला पाहताच तिथे येतात आणि त्याचे चाहते फोटो काढण्यासाठी तिथे गर्दी करतात. तर त्याचे काही चाहते त्याच्याशी गप्पा मारताना दिसतात. या व्हिडीओत प्रसाद ओकनं काळ्या रंगाचं टीशर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत प्रसाद म्हणाला, 'परदेशात जेव्हा आपले चाहते भेटतात तेव्हा लईच भारी वाटतं राव. आपली कलाकृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे. याचं समाधान अवर्णनीय आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


प्रसाद ओकचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'परदेशातील चाहत्यां सोबत हसून फोटो काढताय सर. मग आमच्यासारख्या सध्या मराठी फॅन्स सोबत का नाही??' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुमच्या सारखे मातीला मूर्ती करणारे शिल्पकार या महाराष्ट्रात आहेत....याचा अभिमान वाटतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माझ्यावर विश्वास ठेव. विक्रम गोखले आणि विनय आप्टे नंतर तू एकमेव कलाकार आहेस ज्यावर लोक प्रेम करतील आणि ज्याची स्तुती करतील.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'प्रसाद दादा तुमच्या जागी आता दिघे साहेबच दिसतात, खूप खूप धन्यवाद अक्षरशः परत आणलत साहेबांना तुम्ही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'परदेश आहे पण आपली संस्कृती आवडणारे बघा आपले भारतीय आहेत. आपला इतिहास असो की एखादा धर्मवीर आपला देशाची त्याच्या संस्कृतीची तुलना होणे नाही खूप जबरदस्त चित्रपट आहे सर'


हेही वाचा : 'यापेक्षा समीर चौगुले...', नम्रता - विशाखाचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट


प्रसाद हा फक्त एक अभिनेता नाही तर लोकप्रिय दिग्दर्शक देखील आहे. प्रसादनं चंद्रमुखी या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकनं केलं. तर प्रसाद ओकनं साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका तर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहिली होती. आजही त्याला अनेक लोक आनंद दिघे यांच्या रुपात पाहत आहेत.