Prathamesh Laghate and Mugha Vaishapayan: सारेगमप लिटिल चॅम्प्सफेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली होती. त्यातून या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली आताही पाहायला मिळते आहे. आपल्या या घोषणेनंतर त्यांनी आपल्या नात्याविषयी अनेक खुलासे केले होते. सर्वच चाहत्यांना माहिती आहे की सारेगमप लिटिल चॅम्प्समधून ते दोघं हे एकत्र आले होते. त्यांची पहिली भेट ही तिथेच झाली होती. तेव्हा त्यांची अनेकदा चर्चा असायची. त्या रिएलिटी शोनंतर ते दोघं प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यातून आता ते दोघं लग्न करणार आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. आता त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. तो पाहून त्यांचे चाहते हे पुन्हा एकदा आनंदीत झाले आहेत. सध्या पावसाचे वातावरण आहे त्यामुळे सगळेच जणं हे पावसाचा आनंद लुटायला गेले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनीही पावसात भिजण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी मुग्धानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात ते दोघं आरामात पावसाच्या पाण्यात मनसोक्त भिजत आहेत आणि त्यातून त्यांनी एकमेकांचे हात हातात पडकले आहेत. यावेळी त्यांचा हा फोटो पाहून चाहते आनंदीत झाले आहेत. त्यांच्या या फोटोला चांगलाच प्रतिसाद येताना दिसत असून त्यांच्या चाहत्यांना हा फोटो फार आवडला आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला असून त्याच सोबतच त्यांचा फोटोही व्हायरल झाला आहे. यावेळी मुग्धानं लिहिलं आहे की, ''ये मौसम की बारिश ये बारिश का पानी, ये पानी की बूँदें तुझे ही तो ढूँढें''


हेही वाचा : Gf सोबत सुट्टीवर गेलेला हृतिक रोशन परतला भारतात; before-After फोटो पाहून चाहते गोंधळले


त्यांच्या या फोटोवर चाहत्यांच्या तूफान कमेंट्स आल्या आहेत. कोणी लिहिलंय की, सूर जुळले. कोणी लिहिलंय की, गोड. तर एकानं लिहिलंय की, मेड फॉर इच अदर. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 



सारेगमपचे नवे लिटिल चॅन्म्पसचे पर्व हे सुरू होणार असून चाहत्यांना आता या नव्या पर्वाची उत्सुकता आहे. मागे काही दिवसांपुर्वी जेव्हा हे पर्व नव्यानं सुरू झाले होते तेव्हा पाच फायनलिस्ट्स लिटिल चॅम्प्सना जजिंग केलेले पाहून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते.