मुंबई : ‘माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या मालिकेमुळे तुफान चर्चेत आहे.  मालिकेत प्रार्थना नेहा ही भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात आधिराज्य गाजवत आहे. प्रार्थनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत अससतात. आता देखील प्रार्थनाचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना फार सुंदर दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निळ्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत प्रार्थनाने कॅप्शनमध्ये 'Never stop dreaming blue' असं लिहिलं आहे. नेहाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 



फोटोमध्ये तिने निळा ड्रेस आणि त्यावर घातलेला नेकलेस विशेष लक्षवेधी ठरत आहे. प्रार्थनाच्या चाहत्यांना देखील तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. काही तासांमध्येच अनेक लोकांनी प्रार्थनाच्या या नव्या लूकला पसंती दिली आहे.



‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेपूर्वी प्रार्थना अनेक सिनेमे आणि मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली.  'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रार्थना प्रसिद्धी झोतात आली.  त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही.