मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्तास्थापन, राहुल गांधी यांची वक्तव्य, नागरिकत्व सुधारणा कायदा, आंदोलन यासारख्या घडामोडी महाराष्ट्रासह देशभरात घडत आहेत. हे सगळं होत असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे, ही भावना अभिनेता,दिग्दर्शक प्रवीण तरडेने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सरकारकडून माझ्या काहीच अपेक्षा नाहीत. अपेक्षा ठेवावी असे वातावरणही महाराष्ट्रात नाही', अशी प्रवीण तरडेने निराशावादी सुर आळवला. 'एक शेतकरी म्हणून दिग्दर्शक म्हणून सध्या जे काही चालू हे त्यावर मी नाराज आहे.  सरकार प्रत्येक ठिकाणी येणार नाही. काही आशादायी वातावरण नाही.' तसेच 'सरकार विषयी माझा मनात काय आहे हे माझ्या चित्रपटातुन बाहेर येते,' अशी भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली. 


तसेच त्यांनी कर्जमाफी देऊन शेतकरी सुखी झाला नाही. त्याच्या जमिनी सांभाळा हा मंत्र दिला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. (प्रत्येक स्त्री दुर्गेचं रूप- राणी मुखर्जी) 


'मुळशी पॅटर्न' सिनेमाच्या माध्यमातून प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शकाची महाराष्ट्राला ओळख झाली. शेतकऱ्यांची दुसरी बाजू प्रवीण तरडे यांनी सिनेमातून मांडली. नाशिकमध्ये महिला अत्याचार संदर्भात विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रवीण तरडे बोलत होते. 


तसेच यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील देखील उपस्थित होते. त्यांनी, 'आपल्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे, त्यातूनच हैदराबाद एन्काऊंटर घडलं असेल.  कायद्याने न्याय हा मिळतच असतो तसेच पोलीस यंत्रणा तेवढी सक्षम आहे. केस व्यवस्थित फॉलो करण्याची गरज आहे, अशी भावना विश्वास नांगरे पाटीलांनी व्यक्त केली. 


या कार्यक्रमात अभिनेत्री मुक्ता बर्वे देखील उपस्थित होती. तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'मला कायदा आणि पोलिसांचे अधिकार कळत नाही. पण हैद्राबाद प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे एन्काऊंटर झालं त्यावेळेस मात्र मला बरं वाटलं,' अशी भावना मुक्ताने व्यक्त केली.