Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर विकेंडचा या चित्रपटाला खरंच फायदा झाला. इंग्रजांविरोधात लढण्यासाठी आपलं आयुष्याची फिकीर ज्यांनी केली नाही, त्यांचं आयुष्य आपल्याला या चित्रपटाता पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डानं या चित्रपटात विनायक दामोदर यांची भूमिका सावरकरली. याशिवाय त्यानं याच चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. दरम्यान, या चित्रपटावर लोकप्रिय मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीण तरडे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रवीण यांनी सावरकर या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. तर हे पोस्टर शेअर करत प्रवीण तरडे म्हणाले, "॥धर्मो रक्षिती रक्षित:॥ अफाट अचाट आयुष्य जगलेल्या, जातीपातीला गाडण्यासाठी झटलेल्या, महान व्यक्तीमत्वाची प्रेरणादायी गोष्टं, ताबडतोब बघावा असा तडाखेबंद चित्रपट." ही पोस्ट शेअर करत प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या प्रतिक्रियेवरुन एक गोष्ट कळली की त्यांना हा चित्रपट फार आवडला आहे. 



प्रवीण तरडे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या. एक नेटकरी म्हणाला, "आपल्या सारख्या आघाडीच्या अभिनेत्याने सावरकर चित्रपट पाहण्याचे आवाहन केलेले पाहून आपल्या विषयीचा अभिमान अजून वाढला आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "जबरदस्त चित्रपट... रणदीप हुडाचे मनापासून धन्यवाद... आणि आपण ही पोस्ट करुन प्रचार करत आहात त्याबद्दल आपले देखील आभार प्रवीण तरडेंजी..." तिसरा नेटकरी म्हणाला, "साक्षात सावरकर यांना भूमिकेतून जिवंत करणारे रणदीप हुडा यांना सलाम". आणखी एक नेटकरी म्हणाला, "या चित्रपटासंदर्भात एकाही मराठी कलाकाराची पोस्ट वाचली नव्हती.. पहिली पोस्ट कोणाची येईल याची आतुरतेने वाट पाहत होते ... आणि पहिले कलाकार तुम्ही आहात की ज्यांनी त्यावर पोस्ट लिहिली .. अभिनंदन आणि धन्यवाद"


हेही वाचा : 'मी राजकारणात पैसै कमावण्यासाठी...'; BJP कडून तिकिट मिळाल्यानंतर कंगनाकडून घराणेशाहीचा उल्लेख


या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 1 कोटी 50 लाखांची कमाई केली होती. या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत वाढ झाली असून चित्रपटानं 2 कोटी 75 लाखांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 2 लाख 8 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी सोमवारी 2 कोटी 60 लाखांची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत 9 लाख 65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.