मुंबई : मुळशी पॅर्टन फेम अभिनेता प्रविण तरडे सध्या एका व्हिडिओमुळे खूपच चर्चेत आहे. प्रविण तरडे नेहमीच गावाकडे गेल्यावर शेतात जाऊन काही व्हिडिओ शेअर करताना दिसतो. तसंच काहीसं आता पुन्हा एकदा घडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी प्रविण वडिलांना भेटण्यासाठी अचानक शेतात गेला. यावेळी त्याचे वडिल शेतीच्या कामात व्यस्त होते. यावेळी खास व्हिडिओ शूट करत त्याने शेतकऱ्यांची स्थिती सांगितली आहे. सोबतच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला.


त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, " राज्यातील शेतकऱ्यांनी कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की कितीही संकटं आली तरी खचायचं नाही.


शेती करत राहायची त्याचं कारण शेती विकायची नसते. शेती राखायची असते, हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना न खचता शेती करण्याचा सल्ला दिला. सोबतच राखलेली शेती अशी कसायची असते, याबाबत देखील तरडेंनी सांगितलं आहे.



या व्हिडिओत प्रविण तरडे यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सांगितली आहे. त्याच्या वडिलांनी पाच किलो वाटाणा पेरला पण रोग पडल्यामुळे हातात केवळ अर्धा किलो वाटाणा आल्याचं तरडे म्हणाले. पण तरीही न खचता माझे वडिल शेती करतात. तसंच तुम्हीही शेती करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.