मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटाने नुकताचं सोशल मीडिया अकाउंटवर एक शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तिने तिच्या बागेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये प्रिती बागेतील एक केळीचं झाड दाखवत आहे. झाड दाखवत असताना प्रिती प्रचंड आनंदी दिसत आहे. अत्यंत उत्साही प्रिती सांगते की, तीन वर्षांपूर्वी तिने केळीचे रोप लावले, त्याला आता फळे येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही रोपे लावली आणि त्यांची प्रेमाने काळजी घेतली तर ती तुम्हाला गोड फळे देतील असे प्रिती सांगते. पाहा प्रितीने शेअक केलेला व्हिडीओ...


कच्चा केळ्यांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असतं, ज्यामुळे पाचन क्षमता चांगली होते. तसंच दिवसभर थकवा जाणवत नाही. कच्चा केळ्यांमध्ये असलेल्या विटॅमिन बी 6, विटॅमिन सी पेशींना पोषण देतात. 



कशी कराल केळीची शेती
-  काळ्याचं रोपे लावण्यासाठी बियाणे आवश्यक नाही, ते थेट रोपांसह लावावे लागते.
- पूर्वी नष्ट झालेली केळीची झाडे पुन्हा उगवता येतात.
-  एकत्र अनेक केळ्याची रोप लावावे, एका रोपाने काही हात नाही
- केळीच्या झाडाला सावलीची गरज असते. ते थेट सूर्यप्रकाश सहन करू शकत नाही.
- केळी पिकवण्यासाठीही चांगली माती लागते. केळीचे रोप वाढवण्यासाठी तुम्हाला सुपीक, काळी आणि सेंद्रिय पदार्थांनी भरलेली माती आवश्यक आहे.
-  जर जमीन दगडांनी भरलेली असेल तर ही झाडे तिथे सहज वाढू शकत नाहीत. झाडे लावली तरी हिरवीगार होणार नाही.