मुंबई : सध्या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये प्रिती झिंटाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूस एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. पण सध्या प्रिती संबधित एक चर्चा सुरुये ती म्हणजे प्रिती झिंटा हे अभिनेत्रीचं खरं नाव नाहीये. मात्र सगळ्या चर्चांदरम्यान आता प्रीती झिंटाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या खरं नावाचं रहस्य उघड केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून प्रिती झिंटा हे तिचं खरं नाव नसल्याची चर्चा होती. प्रिती झिंटा हे तिचं खरं नाव नसून प्रीतम सिंग झिंटा हे या अभिनेत्रीचं खरं नाव आहे असं अनेकजणांचं म्हणणं होतं. तिने सिनेसृष्टीत एन्ट्री घेतल्यानंतर तिचे नाव प्रीतमवरून बदलून प्रीती केलं असंही बोललं जातंय. मात्र हे सत्य नाही म्हणत प्रितीने या अफवांवर मौन सोडलं आहे. 


काय आहे  प्रिती झिंटाचं खरं नाव? 
नुकतंच प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंन्टवर एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओव्दारे या सगळ्या अफवा प्रितीने फेटाळून लावल्या आहेत.  याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, "सोशल मीडियावर, गुगल आणि विकिपीडिया, सगळीकडे माझं नाव प्रीती झिंटा असं लिहिलेलं आहे, त्याआधी माझे नाव प्रीतम सिंग झिंटा होते. अशी सगळीकडे चर्चा आहे. मी इथे आले तेव्हा माझं नाव प्रीती झिंटा नव्हतं. असंही सध्या म्हटलं जात आहे. मात्र माझा जन्म झाला तेव्हापासून, माझं नाव प्रीती झिंटाच आहे आणि आत्ता लग्नानंतरही मी अजूनही प्रीती झिंटा हेच नाव लावते. ''
 
मला स्पष्ट करायचं होतं की,  प्रीतम सिंग झिंटा माझं नाव कधीच नव्हतं. लोक मला नेहमी विचारतात. मी माझे नाव बदललं आहे का? तर मी तुम्हाला सांगते, मी माझं नाव बदलेलं नाही. माझं नाव नेहमीच प्रीती झिंटा होतं, आहे आणि राहील. मात्र आता माझं नाव प्रीती जी झिंटा झालं आहे. येवढाच बदल माझ्या नावात लग्नानंतर झाला आहे"


 व्हिडीओ शेअर करताना प्रीती झिंटाने सांगितलं की, बॉबी देओल तिला 'सोल्जर'च्या सेटवर प्रीतम म्हणायचा.  "आज मी मीडियामध्ये एक लेख वाचला की, माझं खरं नाव प्रीतम सिंग झिंटा आहे, त्यामुळे मी स्वतःला मदत कंट्रोल करु शकले नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही फेक न्यूज आहे. सत्य हे आहे की, बॉबी देओलच्या सोल्जर चित्रपटाच्या सेटवर तो मला गंमतीने प्रीतम सिंग म्हणायचा.


हा चित्रपट हिट झाला आणि आमची मैत्री आणखी घट्ट झाली आणि हे नाव माझ्याशी इतकं चिकटलं की, ते आजपर्यंत माझी पाठ सोडत नाहीये. तेव्हापासून आजतागायत मी माझं खरं नाव प्रीती झिंटा आहे असं सांगून कंटाळलेय. आणि मी. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर मी माझे नाव बदलले नाही. मला आशा आहे की या स्पष्टीकरणानंतर मीडिया त्यांची चूक सुधारेल.