'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपलं आणखी एक स्वप्न सत्यात उतरवलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने स्वतःच घर घेतलं आता त्याने आपल्या हक्काची पहिली गाडी घेतली आहे. पहिली गोष्टी ही कायमच खास असते, असं म्हणत त्याने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या', अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


पृथ्वीक प्रतापची पोस्ट 



पृथ्वीकमधील चार गुण सांगत त्याच्या मोठ्या भावाने खास पोस्ट शेअर केली आहे. कुटुंबप्रेमी असलेल्या पृथ्वीकने कुटुंबाचा विचार कायमच पहिल्यांदा केला. पृथ्वीक खूप संयमाने, जिद्दीने - चिकाटीने आणि सर्वात म्हणजे फार प्रामाणिकपणे त्याचं काम करतोय. त्याच्या ह्या गुणांना ह्या 4 चाकांमुळे आणखी गती येवो.. वेळ प्रसंगी संयमाचे ब्रेक सुद्धा कामी येवो हीच सदिच्छा, अशी पोस्ट शेअर केली आहे. 



पृथ्वीक प्रतापच्या मोठ्या भावाने केलेल्या कौतुकावरुन त्याच्यासाठी कुटुंब किती महत्त्वाचं आहे. याची जाणीव होते. पृथ्वीक प्रतापने आपल्या भावाच्या वाढदिवसादिवशी गाडी बुक केल्याचं कळतं. यावरुन यांच्या नात्यातील प्रेम अधोरेखित होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अनेक कलाकारांची प्रगती होताना दिसत आहे. अनेकांनी नवीन घरं घेतली आहेत. तर काही कलाकारांनी नवीन गाड्या घेतल्या आहेत. यामध्ये आता पृथ्वीक प्रतापच नाव देखील यादीत आलं आहे.