मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेच्या प्रत्येक कलाकाराला लोक प्रचंड प्रेम देतात. जर तुम्हीही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका पाहात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मालिकेतील अभिनेत्री लवकरचं दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा पुन्हा सप्तपदी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री दिग्दर्शक पती मालव राजदासोबत पुन्हा लग्न करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 नोव्हेंबर रोजी प्रिया आहुजा आणि मालव राजदा यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली. या खास प्रसंगी ते पुन्हा विवाह बंधनात अडकणार आहेत.  एका मुलाखतीदरम्यान दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अनेक खुलासा केला. लग्नाबद्दल बोलताना प्रिया आहुजाने सांगितले की, यावेळी ती अतिशय सुंदर पेस्टल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहे.



प्रिया म्हणते, पहिल्या लग्नाची साडी अतिशय साधी आणि हलकी होती. त्यामुळे यावेळीही ती एका सुंदर पण कमी वजनाच्या ड्रेसमध्ये दिसणार आहे. मालवच्या ड्रेसबद्दल बोलताना प्रियाने सांगितले की, त्याने स्वतःसाठी एकाही ड्रेसची निवड केलेली नाही. अशा परिस्थितीत मी जे काही घालेन, तिच्याशी रंगसंगती साधून तो ड्रेस घालणार, असे ठरले आहे. 


प्रिया आणि मालव यांना एक गोंडस मुलगा आहे. प्रिया आहुजा तिच्या पालकत्वाचा खूप आनंद घेताना दिसली. ती पालकत्वाशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत राहते. दरम्यान, तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.