मुंबई : रविवारपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे हे दोघं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ओरू अडार लव' या मल्याळम सिनेमातील कलाकार. या दोघांच्या व्हिडिओ सगळ्यांचाच व्हॅलेंटाईन विक एकदम खास करून टाकला आहे. आता यांचा आणखी एक व्हिडिओ म्हणजे या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा 'ओरू अडार लव' या सिनेमाचा ऑफिशिअल टीझर आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा प्रिया अभिनेता रोशन अब्दुल रहूफला घायाळ करते. पण यावेळी तिची स्टाईल जरा हटके आहे. हँडगन किसच्या माध्यमातून ती रोशनची विकेट घेतली आहे. 


दोघंही शाळेच्या वर्गात एकमेकांसोबत फ्लर्ट करत आहे. प्रिया प्रकाशचा हा डेब्यू सिनेमा असून ती पहिल्याच सिनेमांतून लोकप्रिय झाली आहे. हा सिनेमा 3 मार्च 2018 रोजी रिलीज होणार आहे. मंगळवारी किस डेच्या दिवशी 13 फेब्रुवारीला या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. 




रोशन आणि प्रिया वर्गात फ्लर्ट करतात. तेव्हा प्रिया रोशनकडे हँडगन किस पाठवते. आणि पुन्हा एकदा रोशन तिच्या या अदाने घायाळ झाला आहे. रात्री रिलीज झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 2477032 एवढ्या लोकांनी पाहिलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या टीझरमध्ये हा हँडगन किस व्हिडिओ व्हायरल होत आहे.