मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तमिळ सिनेमा उरु अदार लव च्या पहिल्या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर तिच्या अदांमुळे रातोरात लोकप्रिय झाली. आता जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. आता तिचा सिनेमातील गाण्याची एक झलक समोर आली आहे. यात निरागस प्रेमकथेचे दर्शन होते. मात्र प्रियाचा नटखट अंदाज कायम आहे. तर अभिनेता रोशन अब्दुलचा रोमांटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे गाणे पेयर्ले मान्ये यांनी लिहिले आहे. यातही प्रिया आपल्या अदांनी घायाळ करत आहे. तिचा हा नटखट अंदाज पुन्हा एकदा तरुणाईला वेड लावणार आहे. तुम्हीच पहा या गाण्याचा टिझर...



फेब्रुवारीत आलेल्या एका गाण्याच्या टिझरने प्रिया प्रकाश रातोरात प्रसिद्ध झाली. १८ वर्षांच्या या अभिनेत्रीचे ६ लाखांहुन अधिक फॉलोअर्स आहेत. एका दिवसात इतके फॉलोअर्स वाढवून तिने एक रेकॉर्ड बनवला. उरु अदार लव हा सिनेमा सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होईल. प्रियाचा हा पहिलाच सिनेमा आहे.