मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर आपल्या अदांनी धुमाकूळ घालणाऱ्या प्रिया प्रकाश वॉरिअरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काहीसा मजेशीर आहे. यात एक व्यक्ती प्रियाच्या अदांची नक्कल करत आहे. ते पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही. हा ही व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.


इंटरनेटवर पुन्हा प्रियाची धूम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला गेला असून १७ तासात एक लाखाहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियाने इंस्टाग्रामवरुन कमाई करणाऱ्या अनेक सेलिब्रेटींना मागे टाकले आहे.



प्रियाचा जलवा


प्रियाचे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स ५० लाखांनी वाढले. त्यानंतर प्रियाने तिच्या अकाऊंटवरून मोठमोठ्या ब्रॅँडचे प्रमोशन सुरु केले. रिपोर्ट्नुसार प्रिया प्रकाश एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ८ लाख रुपये चार्ज करते. गुगल सर्चमध्येही प्रिया प्रकाशने दीपिका पदुकोण, सनी लियोनी या अभिनेत्रींना मागे सोडले आहे. 'उरु अदार लव (Oru Adaar Love)चे व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर प्रियाला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. मात्र तिने त्या नाकारल्या. 


प्रियाचे आनंदापुढे आभाळ ठेंगणे


इंटरनेट स्टार झाल्यावर प्रियाने सांगितले की, माझ्यासाठी हे सगळे अत्यंत सुखद आहे. मला कळत नाहीये की मी माझा आनंद कसा व्यक्त करु. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी माझ्या कॉलेजमध्येय एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे. मला आशा आहे की सर्व माझ्या आनंदात सहभागी होतील.