इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया कमावते बक्कळ पैसा...
प्रिया वारीयर हे एक दिवसात प्रसिद्ध झालेले नाव.
मुंबई : प्रिया वारीयर हे एक दिवसात प्रसिद्ध झालेले नाव. एका व्हिडिओमुळे या मल्याळम अभिनेत्रीची चर्चा सर्वत्र होऊ लागली आणि रातोरात ती लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर ही व्हायरल गर्ल प्रिया इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जबरदस्त कमाई करत आहे.
इतकी आहे तिच्या एका पोस्टची किंमत
‘उरु अदार लव्ह’या मल्याळम सिनेमातील तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यातीत तिचे हावभाव व दिलखेचक अदांनी अनेकजण घायाळ झाले. आणि रातोरात तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली. सध्या तिने या अकाऊंटवरून अनेक मोठमोठ्या ब्रॅँडचं प्रमोशन सुरू केलं आहे. या प्रमोशनमधून ती बक्कळ पैसा मिळवत आहे. एका ब्रॅंडची एक पोस्ट करण्यासाठी तिला तब्बल ८ लाख रुपये मिळतात. तिची लोकप्रियता आणि फॉलोअर्सची वाढती संख्या यामुळे अनेक मोठे ब्रॅँडस प्रमोशनसाठी तिला विचारत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हे प्रियाच्या कमाईची चांगलेच साधन झाले आहे. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर ५१ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या या प्रसिद्धीमुळे तिला नॅशनल क्रश म्हणून संबोधले जाते.
प्रदर्शनापूर्वीच प्रियाचा जलवा
तिचा ‘उरु अदार लव्ह’हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच तिची लोकप्रियता आणि कमाई थक्क करणारी आहे.