Priyadarshani Indulkar Old Photos: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदूलकर ही अभिनेत्री घराघरात पोहचली आहे. त्यामुळे सगळीकडेच तिचीच चर्चा आहे. यावर्षी आलेल्या 'ती फुलराणी' या चित्रपटातून तिनं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर तिला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा फोटो तिनं अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्यासोबत क्लिक केला आहे. यावेळी तिला ओळखताही येणं कठीण झालं आहे. हा फोटो तिनं ती दहावीत असताना क्लिक होता आणि तोच फोटो तिनं लेटेस्टही क्लिक केला आहे. 13 वर्षांनंतर तिनं प्रिया आणि उमेशसोबत परत फोटो क्लिक करून जूने आणि नवीन फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 10 वी मधे ‘नवा गडी नवं राज्य’, च्या प्रयोगानंतर backstage ला जाऊन फोटो काढलेले, त्या नंतर जवळपास 13 वर्षांनी फोटो काढले, ‘फुलराणी’ च्या premiere नंतर!  यापुढे तिनं लिहिलंय की, त्या प्रीमियरच्या रात्री, त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अभिमान दिसत होता आणि तो क्षण माझ्यासाठी फारच खास होता. खूप प्रेम. ते दोघेही मी पुन्हा सांगते ते दोघेही आजही तसेच काहीसे दिसतात, पण कसे आणि माझ्याबद्दल मी न बोललेलच बरं!


हेही वाचा - ''400 कोटी रूपयांची अय्याशी''; बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करणारी सुझॅन खान ट्रोल


तिला या फोटोचा फार अभिमान वाटतो आहे आणि आता या दोन्ही फोटोंमध्ये ती सारखी दिसण्याचा प्रयत्न करते आहे. यावेळी प्रिया बापटनं तिच्या या पोस्टखाली कमेंट केली आहे. ती म्हणाली की, ''अगं... काय कमाल आठवण आहे ही... तू खूप उत्कृष्ट कलाकार आहेस आणि तूला सगळं प्रेम मिळायला हवं.'' 



तिच्या या फोटोखाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी यावेळी तिच्या वयावरून कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. तिचं आत्ताचं वय काय असेल यावर अनेकांनी कमेंट करायला सुरूवात केली आहे. त्याचसोबत तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर कमेंट करायला सुरूवात केली आहे. यावर्षी आलेल्या ती फुलराणी या चित्रपटातून ती मुख्य भुमिका केली होती. यावेळी तिच्यासोबत भुमिकेत सुबोध भावेही होता. त्या दोघांच्याही अभिनयाचे पुष्कळ कौतुक झाले होते. हास्यजत्रामधूनही ती अवली, लवली कोहलीच्या स्कीटमध्ये प्रेक्षकांचे तूफान मनोरंजन करताना दिसते आहे.