मुंबई : बॉलिवूडची 'देसी गर्ल' सध्या हॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालतेय... हॉलिवूडचा गायक निक जोन्स याच्यासोबत तिचा रोमान्सही फुलताना दिसतोय... सध्या प्रियांकाजवळ बॉलिवूड आणि हॉलीवूडचेही अनेक प्रोजेक्टस आहेत. 'क्वांटिको'च्या शुटसाठी हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या प्रियांकानं त्यानंतर अनेक प्रोजेक्टस साईन केले. यामध्ये एका प्रोजेक्टसाठी तिच्याकडून 'नो प्रेग्नन्सी क्लॉज' साईन करण्यास सांगितलं गेलं. याचा प्रियांकाला धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'मी जर प्रेग्नंट राहिले तर ते मला प्रोजेक्टमधून काढून टाकतील... सोबतच दंडही भरावा लागेल' असं त्या करारात म्हटलं गेलं होतं, असं प्रियांकानं म्हटलंय. 


'ते ऐकून मी हैराण झाले. मला कुणी कसं काय सांगू शकतं की मी कधी प्रेग्नंट राहावं आणि कधी नाही... आजारी किंवा ओव्हरवेट नाही, सरळ-सरळ प्रेग्नंट... त्यांचं म्हणणं होतं की प्रेग्नंट झाले तर आपलं बेस्ट देऊ शकणार नाही' असं म्हणत प्रियांकानं याला आपला आक्षेप व्यक्त केला.


'माझं म्हणणं होतं की मी प्रेग्नंट राहिल्यानंतरही चांगलं काम करू शकेल. या मुद्यावर माझा त्यांच्याशी बराच वाद झाला. मग मी म्हटलं, जर प्रेग्नंट राहिल्यानंतर चांगलं काम करू शकले नाही तर मला काढून टाका... पण मी चांगलं काम करत असेल तर माझा करार संपवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही' असंदेखील प्रियांकानं स्पष्ट करत म्हटलंय.  


अनेकदा प्रोजेक्ट मध्येच रखडू नये यासाठी डायरेक्टर - प्रोड्युसर अशा प्रकारच्या करारावर सही करण्यासाठी अभिनेत्रींना भाग पाडतात. त्यावर प्रियांकानं घेतलेली भूमिका अनेक महिलांना महत्त्वाची वाटतेय.