Priyanka Chopra - करण जोहरचा `हा` व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !
Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : प्रियांका चोप्रानं पती निक जोनससोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियांका आणि करणची भेट झाली. यावेळी प्रियांका आणि करण एकमेकांना फक्त भेटले नाही, तर त्यांनी मिठी मारली आणि हसत एकमेकांशी गप्पा मारल्या.
Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही काही दिवसांपूर्वी तिच्या बॉलिवूडमधील राजकारण असल्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत होती. प्रियांकाच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं (Kangana Ranaut) या सगळ्यासाठी लोकप्रिय निर्माता करण जोहरला (Karan Johar) कारणीभूत ठरवले होते. तिनं म्हटलं की प्रियांकाला करणनं बॅन केलं होतं. आता करण आणि प्रियांकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांना या व्हिडीओत पाहिल्यानंतर त्या दोघांमध्ये मतभेद नसल्याचं दिसून येत आहे.
काल म्हणजेच शुक्रवारी 31 मार्च रोजी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज पासून अभिनय क्षेत्रातील अनेकांनी (NMACC) च्या लॉन्चमध्ये हजेरी लावली होती. हे मुंबईच्या बीकेसी परिसरात असलेल्या जियो वर्ल्ड गार्डनमध्ये नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र (NMACC) चं लॉन्च होतं. यावेळी प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनससोबत दिसली होती. त्यावेळी प्रियांका आणि करण आमनेसामने आले होते. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि हसत एकमेकांशी बोलत होते.
प्रियांका आणि करणचा व्हिडीओ -
दरम्यान, करण जोहरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर लवकरच ती सिटाडेल या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. सध्या ती या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर करण जोहरविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसत आहेत.