मुंबई : अमेरिकन टेलिव्हिजन सीरीज 'क्वांटिको 3' मध्ये व्यस्त असलेली प्रियंका चोप्रा काही दिवसांपूर्वी मुंबईत परतली आहे. मात्र सध्या प्रियंका हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील प्रोजेक्टपेक्षा तिच्या रिलेशनशीपवरून सुरू असलेल्या चर्चांमुळे सतत बातम्यांमध्ये झळकत आहे. 


प्रियंकाहून 10 वर्ष लहान तिचा बॉयफ्रेंड   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका चोप्रा 25 वर्षीत निक जोनस सोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचा चर्चा रंगल्या आहेत. निक हा अमेरिकन गायक आणि गीतकार आहे. अमेरिकेप्रमाणेच मुंबईतही ही जोडी एकत्र फिरत असल्याने त्यांच्या रिलशीपबाबत खूप चर्चा रंगल्या आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा - निक जोनास या लवकरच साखरपुडा?


मुंबईत निक - प्रियंका डेटवर ? 


मुंबईत प्रियंका आणि निक ही जोडी हातात हात घालू एकत्र डेटवर जाताना दिसली आहे. या डिनर डेटवर जाताना दोघांच्याही हातात एकसारखीच रिंग दिसली. त्यामुळे या जोडी नात्यात एकत्र राहण्याचा विचार करत असल्याबाबत चर्चा रंगली आहे.  



गोव्यात फॅमिली व्हेकेशन 


प्रियंका चोप्रा मुंबईत आल्यानंतर कुटुंबासह ती गोव्यात दाखल झाली आहे. पावसाचा आनंद लुटताना प्रियंका आणि परिणितीने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ : प्रियांका-परिणीती म्हणतायत 'टिप टिप बरसा पानी...'