भावाच्या लग्नासाठी प्रियंका मुंबईत दाखल, मंगळसूत्र लूक व्हायरल
प्रियंका चोपडानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला हा फोटो शेअर केलाय
मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा दमदार प्रवास निश्चित करणारी बॉलिवूडची 'देसी गर्ल' निक जोनाससोबत लग्नानंतर 'परदेसी गर्ल' बनलीय. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जोधपूरमध्ये शाही लग्नसोहळा पार पडल्यानंतरही प्रियंका सतत चर्चेत असते. नुकतीच प्रियंका आपल्या भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झालीय. यावेळी प्रियंकाचा एका पिवळ्या रंगाच्या शर्टातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. याचं कारण म्हणजे या फोटोत प्रियंकानं मंगळसूत्र परिधान केलेलं दिसतंय. प्रियंकाचा हा मंगळसूत्र लूक तिच्या फॅन्सना भलताच पसंत पडलाय.
प्रियंका चोपडानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला हा फोटो शेअर केलाय. प्रियंका मुंबई विमानतळावर पिवळ्या रंगाचा टॉप, काळा गॉगल आणि मंगळसूत्रासहीत दिसली.
नुकतंच, आपल्या ज्या जगात राहतो तिथं सुंदरतेचा मापदंड वास्तविक नसल्याचं मत प्रियंकानं पीपल मॅगझीनशी बोलताना व्यक्त केलं होतं.
२००० साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकून प्रियंकानं भारताची मान उंचावली होती. आजही आपली त्वचा सुंदर आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं तिनं म्हटलंय. रात्री झोपण्यापूर्वी मी संपूर्ण मेकअप काढते... स्वत:ला नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पित राहते... हेच वास्तवात जीवनातील अमृत आहे, असंही तिनं म्हटलंय.