पी. टी. उषाच्या भूमिकेत दिसणार `ही` अभिनेत्री !
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका फार ताकदीने साकारली.
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर मेरी कोम हिची भूमिका फार ताकदीने साकारली. आता ती अजून एका स्पोर्ट गर्लची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रख्यात धावपटू पी.टी. उषा हिच्या जीवनावर आधारीत चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. पी.टी. उषा भूमिका प्रियांका साकारणार असल्याचे समजतंय.
प्रियांकाने साकारलेल्या मेरी कोम या भूमिकेचे खूप कौतुक झाले. तो चित्रपट देखील चांगलाच गाजला. या चित्रपटाचे यश लक्षात घेऊन प्रियांकाला पी. टी. उषाच्या भूमिकेसाठी विचारणा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र खुद्द प्रियांकाकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
तामीळ आणि मल्याळम मध्ये अनेक हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक रेवती एस. वर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाचं एकूण बजेट १०० कोटी असून हिंदी, चिनी, इंग्रजी आणि रशियन भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होईल, असं सांगितलं जातं.