Priyanka Chopra - Nick Jonas Divorce : प्रियंकाच्या आईने सोडलं मौन, घटस्फोटावर दिली प्रतिक्रिया
प्रियंकाच्या आईने सोडलं मौन
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या नावासमोरून जोनस हटवताच मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की प्रियांका आणि निकचे लग्न तीन वर्षेही टिकले नाही? प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्याही वेगाने पसरू लागल्या आणि आता याप्रकरणी तिच्या आईचे वक्तव्य समोर आले आहे.
प्रियंकाने काढून टाकलं आडनाव
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती अमेरिकन गायक निक जोनास पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वास्तविक प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पतीचे आडनाव जोनास काढून टाकले आहे. यानंतर दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चेचा बाजार तापला आहे. याआधीही प्रियांका आणि निक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
पण प्रत्येक वेळी प्रियांकाने आपल्या फोटोंद्वारे लोकांना उत्तर दिले आहे की, दोघांमधील प्रेम कायम आहे. पण प्रियांकाने पहिल्यांदाच तिच्या नावावरून पतीचे आडनाव हटवले आहे. कारण याआधी प्रियंका नेहमीच अभिमानाने जोनासचे नाव घेतांना दिसली आहे.
आईने दिली माहिती
प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा अनेकदा अमेरिकेत तिची मुलगी आणि जावईसोबत वेळ घालवताना दिसते. ती निकला आपला मुलगा मानते. अशा परिस्थितीत प्रियांकाच्या घटस्फोटाची बातमी येताच तिने तिची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या बातम्यांना बकवास म्हटले असून अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे. त्याच्या मते, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.
तीन वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
2018 मध्ये प्रियंका चोप्राने निक जोनाससोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्यानंतर प्रियांकाने तिचे नाव प्रियांका चोप्रा वरून बदलून प्रियांका चोप्रा जोनस केले. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडली नाही. पण प्रियांकाने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवरून जोनस आडनाव हटवले आहे. तेव्हापासून दोघांमध्ये काही बरोबर नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जोधपुरमध्ये झालं होतं लग्न
प्रियांका आणि निक जोनासच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. 1 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी जोधपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार थाटामाटात लग्न केले. या लग्नात फक्त कुटुंब आणि काही खास मित्र सामील झाले होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकमेकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी प्रियांकाने चाहत्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही पारंपरिक पद्धतीने दीपालीची लक्ष्मीपूजन करताना दिसले.