निक जोनससोबत प्रियंका चोप्रा लिव इनमध्ये
मुंबईत दिसले एकत्र
मुंबई : निक जोनस आणि प्रियंका चोप्रा यांच अफेअर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. दोघं एकमेकांसोबत अनेक कार्यक्रमात पाहायला मिळाले. सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा आपल्यापेक्षा 10 वर्षाने लहान असलेल्या तरूणाच्या प्रेमात पडल्याच्या देखील चर्चा रंगल्या. या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. कारण प्रियंका आणि निक दोघंही काल रात्री मुबंई एअरपोर्टवर दिसले.
निक जेव्हा प्रियंकाला आपल्या चुलत भावाच्या लग्नात घेऊन गेला तेव्हा या चर्चांना उधाणं आलं. एवढंच काय तर फादर्स डेच्या अगदी दुसऱ्या दिवशी प्रियंका चोप्राने निकच्या वडिलांना सोशल मीडियावर फॉलो केलं. तसेच निकच्या भावाने देखील प्रियंकाला 'ऑसम' अशी कमेंट केली आहे. मात्र प्रियंका चोप्राची आई मात्र या सगळ्या गोष्टी अफवा असल्याचं म्हटलं जातं. खरं तर प्रियंका आणि निकने लग्नाचा देखील विचार केला आहे. आणि प्रियंकाच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार आता हे दोघं लिव इनमध्ये राहण्याचा विचार करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांकाने मुंबईत समुद्र किनारी एक अलिशान बंगला खरेदी केला आहे. हा सुमारे १०० कोटींचा बंगला प्रियांकाचे स्वप्न असल्याचे कळते. यानिमित्त ती एक ग्रॅण्ड पार्टी देऊ इच्छिते. याच पार्टीत निकला आपल्या काही जवळच्या मित्रांना भेटवण्याचाही प्रियांकाचा इरादा असल्याचे कळते. हे खरे असेल तर प्रियांका अगदी नियोजित पद्धतीने आपले रिलेशन पुढे नेत असल्याचे दिसते.