`रिलेशनशिपमध्ये माझं पायपुसणं झालेलं...`, Priyanka Chopra चं मोठं वक्तव्य
Priyanka Chopra on her past relationship: प्रियांका चोप्रानं तिच्या लग्ना आधीच्या रिलेशनशिपविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. प्रियांकानं यावेळी स्पष्टपणे तिच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे. तिच्या आधीच्या रिलेशनशिपमध्ये तिला पायपुसणं असल्याचं वाटल्याचं तिनं सांगितलं.
Priyanka Chopra on her past relationship: बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूडमध्ये तिची छाप सोडत आहे. प्रियांका आज जगभरात ओळखली जाते. तिनं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केल आहे. प्रियांका तिच्या प्रोफेश्नल आयुष्यासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्रियांका तिचा पती निक जोनस बाबतीत नेहमीच मनमोकळेपणानं बोलते. तिचं आणि त्याचं नातं कसं आहे, इतकंच काय नाही तर तो तिच्या आयुष्यात आल्यामुळे तिच्या आयुष्यात कोणते चांगले बदल झाले. तो तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे याविषयी त्यानं सांगितलं. नुकतीच प्रियांकानं एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रियांकानं निक तिच्या आयुष्यात येण्याआधी तिच्या आधीच्या रिलेशनशिपमध्ये तिला पायपुसणं असल्याचे कसे वाटू लागले होते याविषयी सांगितलं आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कॉल हर डॅडी’ या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये प्रियांकाने तिच्या बॉलिवूडमधील रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. प्रियांकाला यावेळी विचारण्यात आलं की असं काही होतं का की जे पाहून प्रियांका तिचा साथीदार किंवा पार्टनर निवडायची. यावेळी प्रियांका स्वत: ला ‘मोनोगॅमिस्ट’ म्हणत पुढे म्हणाली, ‘मी एकामागून एक रिलेशनशिपमध्ये येत राहिले. मी स्वतःला वेळ देणं बंद केलं होतं. मी ज्या कलाकारांसोबत काम केलं किंवा सेटवर भेटलं, त्यांना डेट करु लागले होते. रिलेशनशिप कसे असावे म्हणजेच कशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये मी रहायला हवे हे मला माहित होते आणि याच प्रयत्नात माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला मी त्या साच्यात बसवत गेले.'
प्रियांका पुढे म्हणाली की, निक भेटण्याआधी किंवा त्याच्याशी लग्न करण्याआधी ती ज्या रिलेशनशिपमध्ये होते त्यावेळी तिनं स्वत: ला वेळ देण्याचा निर्णय केला. तिनं स्वत: ला थोडा वेळ देण्याचं ठरवलं. ती प्रत्येकवेळी कोणती चूक करते हे तिला जाणून घ्यायचे होते. तिला असं वाटतं की ती तिचं काम, तिची आवड आणि तिला स्वतःला कधीच महत्त्व न देता त्या मुलाला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. 'परत परत तिचं चुकी करत मी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते आणि त्याला महत्त्व द्यायचे. मी माझं सगळं सोडत त्या व्यक्तीला सगळे निर्णय घेण्याची ताकद द्यायचे. मी कधीच माझा विचार केला नाही. मी एका पायपुसणी प्रमाणे झाले होते. (I literally would become like a doormat) कारण मी ज्या ठिकाणाहून आले तिथे मला असचं शिकवलं होतं की ठीक आहे, प्रत्येत महिलेला हे शिकवण्यात आलं की एका कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी स्त्री ही एका गम प्रमाणे असते. तुम्हाला तुमच्या पुरुषाला तो घरी आला की आनंदी ठेवायचे असते.'
हेही वाचा : मनोज बाजपेयी गेल्या 14 वर्षांपासून रात्री उपाशी झोपतोय; का आली ही वेळ?
प्रियांकाच्या आयुष्यात निक येण्या आधी ती ज्या रिलेशनशिपमध्ये होती त्यामध्ये तिचं अस्तित्व नाही किंवा हरल्यासारखे वाटायचे असं सांगत म्हणाली, निकशी लग्न करण्याआधी प्रियांकानं दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता आणि आपण प्रत्येक वेळी रिलेशनशिपमध्ये कोणती चूक केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही समजून घेणार नाही,
निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांचं 2018 साली लग्न झालं. त्या आधी ते दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांना एक मुलगी असून मालती मेरी चोप्रा जोनस असे नाव आहे.