Manoj Bajpayee : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मनोज वाजपेयी त्याच्या जबरदस्त अभिनयसाठी ओळखला जातो. सध्या मनोज वाजपेयी चर्चेत असण्याचं कारण त्याचा 'सिर्फ एक बंदा ही काफी है' हा चित्रपट आहे. या चित्रपटात एका बाबाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा बाबा कशा प्रकारे एका अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार करतो. त्या प्रकरणावर मनोज वाजपेयी हा वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मनोज हा सध्या व्यस्त आहे. या दरम्यान, देण्यात आलेल्या एका मुलाखतीत मनोज वाजपेयीनं एका खुलासा केला आहे. हा खुलासा करत त्यानं सांगितलं की गेल्या 14 वर्षांपासून त्यानं रात्रीचं जेवण केलं नाही.
मनोज वाजपेयीनं ही मुलाखत कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलला दिली होती. यावेळी त्यानं रात्री जेवणं न करण्याचा निर्णय कसा घेतला आणि त्यासाठी त्याला प्रेरणा कुठून मिळाली याविषयी सांगितलं. त्यासोबत सुरुवातीचे दिवस त्याच्यासाठी त्याचं हे रुटीन पाळण्यात किती कठीण होतं ते सांगितलं. मनोज म्हणाला, 'मी रात्रीचं जेवण करायलं जवळपास 13 ते14 वर्षे झाली आहेत. माझे आजोबा खूप बारीक होते आणि तरी देखील ते फिट होते. म्हणून ते जे रुटीन फॉलो करायचे ते आपणपण फॉलो करून बघू असा मी विचार केला. मग जेव्हा मी ते रुटीन सुरु केले तेव्हा माझ वजन नियंत्रणात आलं. हे पाहूण मला पण खूप बरं वाटलं. निरोगी किंवा मी आता फीट आहे असं वाटू लागलं. त्यानंतर हेच रुटीन आता पुढे फॉलो करायचं असा मी निर्णय घेतला.'
हेही वाचा : नागा चैतन्यसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर Sobhita Dhulipala ने अखेर सोडलं मौन, म्हणाली 'मी स्वतःला...'
मनोज पुढे म्हणाला, 'मग त्यात थोडा वेगळेपणा म्हणून मी उपवास करायला सुरुवात केली, कधी 12 तास, कधी 14 तास. मी हळू हळू मग रात्रीचे जेवण करण टाळू लागलो. दुपारचं जेवण झालं की आमच्या स्वयंपाकघरात काहीही बनवलं जात नाही. आमची मुलगी हॉस्टेलमधून आल्यावरच रात्रीचं जेवणं बनवले जातं.
मनोज वाजपेयीनं त्याला हे रुटिन फॉलो करताना सुरुवातीला आलेल्या अडचणींविषयी खुलासा केला आहे. मनोज म्हणाला, सुरुवातीला हे रुटिन फॉलो करताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भूक भागवण्यासाठी मी भरपूर पाणी प्यायचो आणि बिस्किटं खायचो. या रुटिनमुळे त्याच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झाला. यामुळे मनोज बाजपेयीला कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हृदयविकार यासारख्या कोणत्याच समस्या नाहीत.