मुंबई :  बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये पोहोचलेल्या प्रियांका चोप्राला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. प्रियांका चोप्रा तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. तिने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून तिचं ड्रेसिंग खूप बदलला आहे. पण कधीकधी ड्रेसवर अधिक प्रयोग केल्याने नुकसानचं होतं. असंच काहिसं प्रियांका चोप्रासोबत घडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका Oops Moment ची शिकार
प्रियंका चोप्राने तिच्या मेहनतीच्या जोरावर आपलं नाव कमावलं आहे. जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. ग्लोबल स्टार असूनही प्रियांका तिच्या स्टाइलशी तडजोड करत नाही. ड्रेसिंगच्या बाबतीत ती लोकांसाठी आदर्श आहे. पण कधी कधी जास्त स्टायलिश दिसणं देखील चुकीचं ठरतं. नुकतंच प्रियांकाच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. नुकतीच ती एका अवॉर्ड फंक्शनला असे कपडे परिधान करून गेली होती. ज्यामुळे तिला Oops Moment चं शिकार व्हावं लागलं.


प्रियांकाला येत नव्हता तिचा ड्रेस सांभाळता 
नुकतीच प्रियांका चोप्रा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली होती. या फंक्शनमध्ये ती खूप बोल्ड ड्रेस परिधान करून पोहोचली होती. तिचा ड्रेस पुन्हा पुन्हा सांभाळावा लागत होता. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या ड्रेसला  इतका कट होता की तिच्या पायाचा काही भाग स्पष्ट दिसत होता. प्रियंकासोबतचा हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला, त्यानंतर अनेक यूजर्सनी तिला ट्रोल केलं. जरी प्रियांका चोप्रा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि तिने मॅचिंग हाय हील्स घातल्या होत्या. 



या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकाने परिधान केलेला ड्रेस हा थाई हाय कट होता. या ड्रेसमध्ये ती स्वत:ला अस्वस्थ फिल करत होती. अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांका चोप्रा तिचा ड्रेस फिक्स करताना दिसली. यादरम्यान ती ops Moment ची शिकार  झाली.