Priyanka Chopra Surrogacy: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आणि देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) हे सेलिब्रिटी कपल 2022 मध्ये आई वडील झाले. प्रियांका आणि निकने (priyanka chopra baby) आपल्या लाडक्या लेकीचं नाव 'मालती मॅरी' (malti marie) ठेवलं. प्रियांका चोप्राने स्वतः बाळाला जन्म न देता सरोगसीचा (Priyanka Chopra Surrogac) पर्याय स्वीकारला. त्यावरून ती ट्रोल देखील झाली होती. मात्र, तिने यावर उत्तर दिलं नव्हतं. त्यानंतर आता प्रियांकाने खुलासा केला आहे. (Priyanka Chopra opens up For the first time about daughter malti marie birth complications marathi bollywood news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका चोप्रा हिने नुकतंच तिची मुलगी मालती मेरी जोनास (Priyanka Chopra daughter) सोबत फोटोशूट केलं. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि आता तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा मी स्वतःला खूप मजबूत बनवते. पण जेव्हा ते माझ्या मुलीबद्दल बोलतात तेव्हा खूप त्रास होतो, असं प्रियांका चोप्रा म्हणाली आहे. 



काय म्हणाली Priyanka Chopra?


आमच्यासाठी हा निर्णय गरजेचा होता. मी या गोष्टीनं खूश आहे की मी ते करु शकले आणि तो माझ्यासाठी योग्य निर्णय ठरला. आमची सरोगेट खूपच प्रेमळ आणि मजेदार होती. तिनं आमच्या या मुलीचा तब्बल सहा महिने सांभाळ केला.


आणखी वाचा - What is Surrogacy: सरोगसी नक्की काय आहे, ज्याद्वारे Priyanka Chopra झाली आई?


दरम्यान, जेव्हा लोकं माझ्या मुलीबद्दल नको ते बोलतात तेव्हा खूप त्रास होतो, असं प्रियांका चोपडा म्हणते. मी माझ्या आयुष्याच्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्याबद्दल फार विचार करते. माझ्या मुलीला काही बोललेलं मी सहन करणार नाही. हे फक्त माझं नाही तर तिचं स्वतःचं आयुष्यही आहे, असं म्हणत तिने खडेबोल (Priyanka Chopra) सुनावले आहेत.