मुंबई : देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेत ११,४०० कोटी रूपयांचा अपहार झाला आणि देशभरात एकच खळबळ उडाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्याआधीच अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी हा देश सोडून पसार झाला.


या घोटाळ्यानंतर नीरव मोदी डायमंड्सची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या प्रियंका चोप्राने नीरव मोदीसोबत सर्व व्यवहार तोडणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.


'ते' वृत्त खोटं


अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्याला करारानुसार रक्कम न दिल्याचा आरोप करत नीरव मोदी विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, हे वृत्त चुकीचं आहे.


करार मोडणार?


प्रियंका चोप्रा सध्या कायदेशीर सल्ला घेत असून नीरव मोदी सोबत असलेले करार मोडण्यावर विचार सुरु आहे अशी माहिती प्रियंकाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.


मोठा घोटाळा 


देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बॅंक पंजाब नॅशनल बॅंकच्या मुंबईच्या शाखेतील १० हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. ही रक्कम मुंबईतील एका शाखेतून घोळ करून अनधिकृतपणे देवाण-घेवाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.



नीरव मोदीचं सेलिब्रिटी कनेक्शन


वादग्रस्त हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या ब्रँडची भुरळ अगदी हॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींनाही पडली होती. हॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्री केट विन्सलेट, डकोता जॉन्सन, ताराजी हेन्सन यांनी नीरव मोदी ब्रँड अँबॅसिडर म्हणून जाहिराती आणि प्रचार, प्रसार केला. गेल्यावर्षी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिलाही त्यांनी ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडलं होतं.