`जीन्स काढून घेतल्या अन् ...`, बाल्कनीत मुलगा येताच Priyanka Chopra च्या वडिलांनी लागू केले नियम
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा ही सध्या तिच्या सिटाडेल या सीरिजमुळे चर्चेत असली तरी देखील लवकरच ती `फॉल इन लव्ह अगेन` या चित्रपटात दिसणार आहे. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकान अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर तिच्यासोबत काय झाले याविषयी सांगितले आहे.
Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या सिटाडेल या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तर प्रियांका दुसरीकडे तिच्या ‘मेट गाला 2023’ चा लूकनं तर सगळ्यांचे लक्ष वेधले. प्रियांकानं यावेळी 204 कोटींचा डायमंड नेकलेस परिधान केला होता. दरम्यान, प्रियांकानं नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रियांकानं तिचं वडील अशोक चोप्रा यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
प्रियांकानं नुकतीच ‘हॉवर्ड स्टर्न’ या अमेरिकन रेडिओ शोला मुलाखत दिली होती. त्यावेळी प्रियांकानं ती 12 वर्षांची असताना अमेरिकेला गेली होती आणि त्यानंतर 16 वर्षांची झालेली प्रियांका जेव्हा भारतात आली तेव्हा तिच्यासोबत काय झालं आणि तिच्या वडिलांनी तिच्यासोबत काय केलं ते सांगितलं. 'मी वयाच्या १६ व्या वर्षी भारतात परतले होते. त्यावेळी माझ्यात अमेरिकन जीवनशैलीप्रमाणे बदल झाले होते. हे बदल माझ्या वडिलांना मुळीच आवडले नव्हते. माझ्या वडिलांना काही कळत नव्हत, कारण त्यांनी एका १२ वर्षाच्या मुलीला जिच्या वेण्या घालून अमेरिकेला पाठवले होते. तिनं ब्लो ड्राय केला. वयाच्या 16 व्या वर्षा माझ्या वडिलांनी जशी अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त माझ्यात बाईपण आलं होतं. मी जेव्हा इथे परतले तेव्हा मी एका छोट्या गावात राहत होते त्यामुळे एक मुलगी म्हणून माझ्या मागे सतत मुलं रहायचे जसे अमेरिकेत असताना रहायचे. एकदा तर एक मुलगा रात्री माझा पाठलाग करत थेट आमच्या बाल्कनीपर्यंत पोहोचला होता. यानंतर वडिलांनी खिडकीला सळ्या लावून घेतल्या आणि मला सगळे वेस्टर्न कपडे घालण्यास मनाई केली आणि ड्रेस किंवा मग लूज कपडे परिधान करण्यास सांगितले,' असं प्रियांका म्हणाली.
त्या घटनेनंतर प्रियांकाचे वडील तिला म्हणाले, 'एकतर तू ढगळे कपडे परिधान कर किंवा मग भारताचे पारंपारिक कपडे आहेत ते परिधान कर. याविषयी सांगताना प्रियांका म्हणाली, तिच्याकडे लूज कपडे नव्हते म्हणून ती तिच्या वडिलांचे आवडते शर्ट परिधान करायची. इतकंच काय तर त्या शर्टाला खालून गाठ बांधायची आणि बटन उघडी ठेवायची. तर त्याच्यासोबत जीन्स परिधान करायचे. तिला पाहून सगळे तिचीच चर्चा करायचे की ती कसे कपडे परिधान करते. '
हेही वाचा : PS 2 विसरा, 'महाराष्ट्र शाहीर'च्या कमाईचा आकडा गाजतोय पाहिलं का?
पुढे प्रियांका म्हणाली, 'माझ्या वडिलांनी असं का केले हे मला त्यावेळी कळले नाही. मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही, त्या दिवशी मला काही कळतच नव्हतं. जेव्हा माझ्या बाल्कनीत एका मुलाला मी पाहिले तेव्हा मी जोरात किंचाळले आणि वडिलांकडे गेले. हे पाहता तो मुलगा तिथून पळून गेला. त्यानंतर माझे वडील म्हणाले, की तुला आता या पुढे नियमांची गरज आहे. ते ऐकूण मी चिडले आणि त्या दिवसात जेव्हा मी भारतात परतले होते तेव्हा तर मी जरा जास्त हट्टी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्याविषयी सांगितलं.'