Maharashtra Shahir Box Office Collection : 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं. चित्रपटाच केदार शिंदे यांचे आजोबा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्यांच्या आजोबांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी थोडक्यात दाखवलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये चांगलीच गर्दी करत आहेत. तर अभिनेता अंकुश चौधरीनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांना भूरळ घातली. अनेकांनी तर तो अंकुश नव्हता ते शाहीर साबळे होते असं वाटल्याचं देखील सांगितलं. आता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेऊया.
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सहा दिवसात जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटानं सहा दिवसात 3.33 कोटींची कमाई केली आहे. तर पहिल्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 30 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी विकेंड पाहता चित्रपटानं 55 लाख रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी 60 लाख कमावले. चौथ्या दिवशी म्हणजेच 'महाराष्ट्र दिना'च्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली होती. त्यादिवशी चित्रपटानं 1.03 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटानं 34 लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले तर सहाव्या दिवशी 31 लाख रुपयांती कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शनाच्या सहा दिवसात चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 3.33 कोटींची कमाई केली आहे.
Maharashtra Shaheer Day 6 Night Occupancy: 11.56% (Marathi) (2D)
#MaharashtraShaheer
https://t.co/0oYIffRTJZ— Sacnilk Entertainment (@SacnilkEntmt) May 3, 2023
हेही वाचा : PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला
केदार शिंदे यांची लेक सना शिंदेनं 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर सनानं या चित्रपचात भानुमती साबळे यांची भूमिका साकारली होती. शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश दिसला आहे. तर अंकुशनं केलेली ही पहिली बायोपिक आहे. या आधी त्यानं अनेक चित्रपट केले पण कोणती बायोपिक फिल्म केली नाही. तर त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट इथेच थांबला नाही तर या चित्रपटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरूजी आणि लता मंगेशकर यांच्या भूमिका देखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला संगीत हे अजय-अतुल यांनी दिले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद हे लेखिका प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.