प्रियांका चोप्रावर का आली मुंबईतील दोन्ही घरं विकण्याची वेळ?
प्रियांकाच्या नावावर मुंबई, गोवा आणि लॉस एंजेलिसमध्ये फ्लॅट आहेत.
मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचं नाव हे सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत टॉपला आहे. आर्थिकदृष्या यशस्वी असलेल्या अमेरिकेतील सेलिब्रटींमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा नाव देखील सामील आहे. प्रियांकाच्या मुंबईतील प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं, तर मुंबईत प्रियांकाचे अनेक फ्लॅट्स आणि ऑफिसेस आहेत.
प्रियांकाला घर खरेदी करण्याची खूप आवड आहे. बऱ्याचदा प्रियांका घरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सर्वात जास्त पसंत करते. त्यात आता बातमी समोर आली आहे की प्रियांकाने मुंबईतील आपले दोन्ही फ्लॅट विकून टाकले आहेत. ज्यासाठी तिला कोटींचा भाव मिळाली आहे.
प्रियांकाने तिचे मुंबईतील 2 फ्लॅट तब्बल 7 कोटी रुपयांना विकले आहेत. प्रियांकाच्या नावावर मुंबई, गोवा आणि लॉस एंजेलिसमध्ये फ्लॅट आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , प्रियांकाने मार्च 2021मध्ये अंधेरीतील वर्सोवामधील राज क्लासिक या अपार्टमेंटमध्ये असलेले दोन्ही फ्लॅट विकले आहेत. त्यातील एका फ्लॅटसाठी प्रियांकाला 3 कोटी रुपये मिळाले आहेत, तर त्याच अपार्टमेंटमधील प्रियांकाच्या दुसऱ्या घरासाठी तिला 4 कोटींची रक्कम मिळाली आहे.
सोबतच , प्रियांकाने तिचं मुंबईतील एक ऑफिस हे भाड्याने दिलेलं आहे. प्रत्येक महिन्याला या ऑफिसचं 2.11 लाखांचं भाडं प्रियांकाच्या खात्यात जमा होतं. प्रियांकाची ही प्रॉपर्टी अंधेरीमध्ये आहे.