मुंबई :  प्रियांका चोप्राने आपल्या लहानपणाचा फोटो शेअर केलाय. तिच्या या फोटोमध्ये तिचे आई-बाबाही दिसतायत. 'खूप जुनी आठवण ताजी करतेय', मम्मी,डॅडी आणि मी', अशी कॅप्शन तिने या फोटोसोबत दिली. मी आतापर्यंत हा फोटो पाहिला नव्हता. या फोटोचा स्केच भिंतीवर आहे जो डॅडींनी केलाय. एक सर्जन असण्यासोबत ते क्रिएटीव्ह माणूसदेखील आहेत.


'भारत'मध्ये दिसणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर ती पुन्हा बॉलीवुडमध्ये येण्यास उत्सुक आहे.दहा वर्षांनंतर सलमानसोबत 'भारत' या आगामी सिनेमात दिसणार आहे.



तिने २००८ मध्ये सलमानसोबत 'गॉड तुसी ग्रेट हो' मध्ये काम केलं होतं.  सलमानचा 'भारत' हा सिनेमा कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर' सिनेमाचा रिमेक आहे.