नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या परदेशात 'क्वांटिको' या टी.व्ही. शो मध्ये व्यस्त आहे. 'क्वांटिको' मधील आपली सहकलाकार मार्ली मॅटलिनसोबतचे काही खास क्षण तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले.


प्रियंकाने शेअर केले फोटोज


हे फोटोज शेअर करताना प्रियंका लिहते की, मार्ली मॅटलिन ही अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. पण ती चांगली उशीही होऊ शकते. या फोटोत प्रियंका मॅटलिनच्या मांडीवर डोके ठेवून झोपली आहे. 
प्रियंका सध्या 'क्वांटिको'च्या तिसऱ्या सीजनचे शूटिंग करत आहे. या शो मध्ये प्रियंका एलेक्स पेरिसच्या भूमिकेत दिसणार आहे.