मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये रमल्याने २०१६ मध्ये आलेल्या जय गंगाजल सिनेमानंतर आता ती नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खानसोबतचा भारत सिनेमा सोडल्यानंतर प्रियंका लवकरच सोनाली बोसचा सिनेमा 'द स्काय इज पिंक' मध्ये झळकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील आहेत. सिनेमाचे शूटिंग नुकतेच सुरु झाले आहे. याची माहिती खुद्द प्रियंकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली.



तिने लिहिले की, मी आज खूप उत्साहीत आहे. काही कथा फक्त सांगितल्या जातात. आशया चौधरी आणि त्यांचे आईवडील अदिती आणि नीरेनच्या आठवणीत आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत एक सुपर स्पेशल प्रोजेक्ट 'द स्काय इज पिंक'. आजपासून शूटिंग सुरु होईल.



कथेनुसार सिनेमाचे शूटिंग मुंबई, दिल्ली, लंडन आणि अंदमानमध्ये होईल. जूही चतुर्वेदीने सिनेमाचे संवाद लिहिले आहेत आणि प्रीतम चक्रवर्तींनी सिनेमाला संगीत दिले आहे. या सिनेमाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे.



प्रियंकाने भारत सिनेमा सोडल्यामुळे सलमान खानला अनेक प्रश्न विचारले जात आहेत.



यावर सलमान खानने सांगितले की, प्रियंकासाठी खूप खूश आहे. जर आम्हाला माहित असतं की, प्रियंकाने अजून एक फिल्म साईन केली आहे. तर आम्ही तिला कधीच अडवलं नसतं. पण आम्हाला तिच्या निर्णयाबद्दल खूप उशिरा समजलं. भारत सिनेमाचे शूटिंग सुरु झाले होते आणि त्यानंतर १० दिवसांनीच तिच्या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार होते. 



'द स्काय इज पिंक' शिवाय क्रिस पॅट्सच्या 'Cowboy Ninja Viking' या सिनेमात प्रियंका दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूड्चे अनेक प्रोजेक्टस आहेत.