हीच ती लग्नाची लाली.... म्हणत प्रियांकाने पोस्ट केला `हा` फोटो
शेअर केल्या आपल्या सुंदर भावना
मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा पति निक जोनससोबत सध्या हनीमूनला गेली आहे. दोघांनी आपल्या या खास क्षणांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. ओमानमध्ये हे दोघं आपला स्पेशल हनीमून साजरा करत आहे.
प्रियंका चोप्राने इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोन फोटो आहेत एकात निक आणि प्रियंका आपले खास क्षण एकमेकांसोबत घालवत आहेत. प्रियंकाच्या हातावरील मेहंदी ही अगदी तिच्या नववधुची साक्ष देत आहे.
तर दुसऱ्या फोटोत प्रियंकाने बीचच्या किनाऱ्यावर वाळूत बदामाच चित्र काढून त्यामध्ये निक जोनसचे आद्याक्षर (NJ) आणि प्रियंका चोप्रा जोनसचे (PCJ) अशी आद्याक्षर लिहिली आहेत.
प्रियंकाच्या या फोटोंमध्ये त्या दोघांची केमिस्ट्री दिसत आहे. या फोटोंमध्ये त्या दोघांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. प्रियंका - निक हनीमूनला जाण्याअगोदर मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशन करता उदयपुरमध्ये पोहोचले होते.
एवढंच नाही तर प्रियंकाने त्या कार्यक्रमात मस्त डान्स देखील केला. प्रियंकाला लग्नाअगोदरच्या एका मुलाखतीत हनीमूनला कुठे जाणार असा सवाल केला असता अजून काही डिझाइन न केल्याचं सांगितलं.
प्रियंका हनीमूनवरून आपल्यावर 'द स्काय इज पिंक' या सिनेमाचं शुटिंग पूर्ण करणार आहे. या सिनेमाकरता ती अहमदाबादला रवाना होईल. या व्यतिरिक्त तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.