स्वत:च्या रेस्टॉरंटमध्ये `या` दिग्दर्शकाला पाहून प्रियंका चोप्राला बसला धक्का
चित्रपट दिग्दर्शकाची प्रियांकाच्या `सोना` रेस्टॉरंटला भेट
मुंबई : चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज नुकतेच न्यूयॉर्कला गेले होते आणि तेथे जाऊन त्यांनी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'सोना' रेस्टॉरंटला भेट दिली आहे. ज्याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता. आता विशाल भारद्वाजच्या पोस्टवर प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया आली आहे.
विशाल भारद्वाजने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "फ्रेंड्ससोबत सुंदर रात्री आणि न्यूयॉर्कमध्ये एका ट्विस्टसोबत मजेशीर देसी जेवण.." या पोस्टसोबत, त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये विशाल भारद्वाज यांच्या चेहऱ्यावर स्माईल दिसत आहेत. त्यांच्यासोबत इतरही अनेक लोकं दिसत आहेत. जे रेस्टॉरंटमध्ये जाऊन खूप आनंदी दिसत आहेत.
विशाल भारद्वाजच्या पोस्टवर प्रियंका चोप्राने कमेंट करत लिहिलं आहे की, "सर तुम्हाला आवडलं याचा खूप आनंद झाला आहे. तुमचं नेहमीच स्वागत आहे. 'सोना न्यूयॉर्क.'मध्ये प्रियांका चोप्राने मागच्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये सोना रेस्टॉरंट लॉन्च केलं होतं. प्रियांका अनेकदा तिच्या रेस्टॉरंटमध्ये जात असते.
विशाल भारद्वाजच्या दिग्दर्शनाखाली रिलीज झालेल्या 2009 मध्ये 'कमिने' चित्रपटात आणि 2011 मध्ये 'सात खून माफ' या चित्रपटात प्रियांका चोप्राने काम केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या रेस्टॉरंटच्या लॉन्चिंगवेळी प्रियांका चोप्रा शूटिंगमध्ये व्यस्त होती. मात्र, रेस्टॉरंटची घोषणा करत तिने सांगितलं होतं की, याचं नाव निक जोनासने ठेवलं आहे.